चिखलीत जमीनीच्या वादातून ५५ वर्षीय इसमाला मारहाण

चिखलीत जमीनीच्या वादातून ५५ वर्षीय इसमाला मारहाण

चिखलीत जमीनीच्या वादातून ५५ वर्षीय इसमाला मारहाण व‌ जीवे मारण्याची धमकी 

पिंपरी, ता. १२ -‌तळवडे-चिखली येधीलशेलारवस्तीत जमीन वादातून एका 55 वर्षीय इसमाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 23 हे रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपींवर 11 जूनला चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अतुरसिंग दयालसिंग चंदानी (वय ५५, व्यवसाय – कन्स्ट्रक्शन) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुशिल गुप्ता, अनिल गुलाब शेलार आणि युवराज शेलार यांनी त्यांना धमकावले आणि मारहाण केली.

दिनांक २३/०५/२०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता फिर्यादी उंदरांनी हे ऑफिस बंद करून घरी जात असताना आरोपी सुशिल गुप्ता यांनी त्यांना थांबवले. आरोपीने सांगितले, “मी येथे फॅक्टरी शेड बांधणार आहे व इलेक्ट्रीक कनेक्शन घेणार आहे.”

फिर्यादींनी सांगितले की, जमीन ही त्यांच्या वडिलांनी महसूल विभागाकडून लिलावाद्वारे विकत घेतलेली आहे. यावर आरोपी गुप्ता याला राग आला आणि त्याने आरोपी अनिल शेलार व युवराज शेलार यांना .यांना बोलावून फिर्यादीस  धमकावले.

चंदानी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आरोपी अनिल शेलार याने  डावे गाल व डोळ्यावर मुक्के मारले, तर युवराज शेलार यांनी तोंडावर सिमेंटचा गड्डा मारल्यामुळे चंदानी यांचा दात तुटला व कानास दुखापत झाली. सुशिल गुप्ता यांनी हाताने थप्पड मारत, मारण्याची धमकी दिली. आरोपी अनिल शेलार यांनी  कोयता दाखवून पुन्हा मारहाण करण्याची व मारुन टाकण्याची धमकी दिली. आरोपी अद्याप अटक नाही; पोलिस तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories