रावेतमध्ये १ लाख ५४ हजारांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त, आरोपी अटक
पिंपरी, ता. १२ - रावेतमध्ये रामकृष्ण हॉटेल जवळ बी.आर.टी. रस्त्याकडेला फुटपाथवर लाख ५४ हजारांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आम्ही पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई 10 जून रोजी केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण हॉटेल जवळील फुटपाथावर आरोपी नितेशप्रताप उमाप्रताप सिंह (वय ३१, रा. आदर्श नगर, किवळेगांव, पुणे) याला अवैध तंबाखूजन्य वस्तू विक्रीसाठी बाळगताना पकडले. आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू, पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ, एकूण १,५४,०४८/- रुपये किंमतीचा माल होता.
या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ शरीरावर गंभीर हानी पोहोचवू शकतात, तसेच मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात, असे अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र यांच्या आदेशात नमूद आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.