घरात झोपलेल्या पत्नीला ६५ वर्षीय पतीने केली लोखंडी पट्टीने मारहाण, पतीला अटक

घरात झोपलेल्या पत्नीला ६५ वर्षीय पतीने केली लोखंडी पट्टीने मारहाण, पतीला अटक

 घरात झोपलेल्या पत्नीला ६५ वर्षीय पतीने केली लोखंडी पट्टीने मारहाण, पतीला अटक

पिंपरी, ता. १० - घरात झोपलेल्या पत्नीला ६५ वर्षीय पतीने लोखंडी पट्टीने मारहाण केल्याची घटना चिखली गावठाण परिसरात ९ जूनला घडली आहे. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

९ जूनला रात्री ११ वाजता पत्नी घरात झोपलेली असताना पत्नी नकळत तिच्या हातावर व खांद्यावर लोखंडी पट्टीने मारले. त्यामुळे पत्नीला दुखापत झाली आहे. याबाबत पत्नीने तक्रार दिली असता पती संपत हरीभाऊ भोसले (वय ६५ वर्षे ) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

आरोपी पतीवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories