रागाच्या भरात हिंजवडीत तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण
पिंपरी, ता. १० - मित्राला चाळीतून बाहेर काढल्याच्या रागातून २६ वर्षीय युवकाने ३८ वर्षीय तरुणाला लोखंडी हत्याराने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. १०) रात्री १ वाजता हिंजवडीतील हुलावळे वस्ती रूम नंबर ११ समोरील मोकळ्या जागेत घडली.
यामध्ये जखमी झालेले बालाजी शेषराव शिंदे (वय ३८) याने पोलिसांत तक्रार दिली. आरोपी बिक्रम मदन सरकार (वय २६, वेटर, मूळ पश्चिम बंगाल) याने त्याच्या मित्राला चाळीतून बाहेर काढल्याबद्दल रागाने बालाजीवर हल्ला केला. बिक्रम याने शिवीगाळ करत, "तु मालीक का चमचा है, आज तुझे बताता हूँ, में कौन हूँ!" असे म्हणत लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यावर आणि डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार केले. त्यात बालाजी गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप अटक नाही.
आरोपीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३५१(२), ३५२ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१),(३) सह १३५ नुसार दाखल करण्यात आला आहे.