पीजीमध्ये राहणाऱ्यांनो सावधान ; चिंचवडमध्ये लॅपटॉप चोरीला

पीजीमध्ये राहणाऱ्यांनो सावधान ; चिंचवडमध्ये लॅपटॉप चोरीला

चिंचवड | २८ नोव्हेंबर २०२६ : चिंचवडच्या फुलेनगर परिसरात लॅपटॉपसह 18 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.  पीजीच्या खोलीत ठेवलेली लॅपटॉपची बॅग चोरीला गेल्याची तक्रार एका रहिवाशाने चिखली पोलिसांत दिली आहे. बॅगेत मोबाईल, दोन घड्याळे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे तक्रारीक सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबरला सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान फुलेनगरमधील बेड बॉक्स पीजी येथे चोरी झाली. खोलीच्या उघड्या दरवाजातून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीतील लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, हेडफोन, घड्याळे, ओळखपत्रे आणि बँक कार्डांसह १८ हजार रुपयांचा ऐवज बॅगेसह उचलून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 प्रशांत संजय कोळगे (वय ३४, रा. फुलेनगर, चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चिखली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार स्वामी  पुढील तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories