MPSC उमेदवारांना आणखी एक संधी ; गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ

MPSC उमेदवारांना आणखी एक संधी ; गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ

पुणे | २८ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या पात्र उमेदवारांना आणखी एक संधी मिळाली आहे. समतुल्य शैक्षणिक अर्हतेबाबत शुद्धिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अर्ज सादर करण्याची मुदतीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार, उमेदवारांना रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत अर्ज पोर्टचा वापर करावा.

आयोगाने विविध शासकीय विभागांकडून आलेल्या मागणीपत्रांच्या आधारे २५ जून २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अतिरिक्त मागणीपत्रांचा समावेश करण्यासाठी ६ नोव्हेंबरला शुद्धिपत्रक काढण्यात आले. त्यावेळी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.

दरम्यान, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून २७ नोव्हेंबरला प्राप्त झालेल्या अभिप्रायाच्या आधारे आयोगाने त्याच दिवशी समतुल्य शैक्षणिक अर्हतेबाबत नवे शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले. या शुद्धिपत्रकानुसार पात्र ठरणारे उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी आयोगाने मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीची शैक्षणिक अर्हता तपासावी.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories