बावधनमध्ये मध्यरात्री पोलिसांचा छापा ; १.४० लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बावधनमध्ये मध्यरात्री पोलिसांचा छापा ; १.४० लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बावधन | २८ नोव्हेंबर २०२६ :  बावधन परिसरात अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाकडून हजारो किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात बावधन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत एक लाख ४० हजार रुपये आहे.  शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) मध्यरात्री १२.२५ वाजण्याच्या सुमारास बावधन चौपाटी चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई अक्षय शहाजी लाटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पार्थ विजय काळे (वय २१, रा. सनसिटी, सिंहगड रस्ता, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन चौपाटी चौकाजवळ करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पार्थ काळे याच्याकडे १४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. संबंधित अमली पदार्थ त्याने विक्रीसाठी बाळगल्याचा पोलिसांचा आरोप आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजित किंमत 1 लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी बावधन पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियमाच्या (NDPS Act) कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ठाकरे पुढील तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories