पिंपळे गुरव | २८ नोव्हेंबर २०२६ : देवकर पार्क परिसरातील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरीच्या मुख्य अग्निशमन केंद्रातून पथक रवाना झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण मंगल कार्यालयात शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) गॅस गळतीमुळे आग लागली. सायंकाळी ५.५२ वाजता राज भिंगारकर यांनी अग्निशमन दलाला फोन करून गॅस गळतीची माहिती दिली. त्यानंतर पिंपरीच्या मुख्य अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहन घटनास्थळी पाठवण्यात आले.
आगीत मंगल कार्यालयातील पियानो, कपडे, पंखा आणि गॅस रेग्युलेटर जळाले. या साहित्याचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या कारवाईत स्टेशन ऑफिसर गौतम इंगवले, लीडिंग फायरमन विजय घुगे, वाहनचालक विनायक मोहरे यांच्यासह मिलिंद कवठे, ऋषिकेश खंडागळे, दत्तात्रय जाधव, ऋषिकेश मोरे आणि स्नेहा आंबेकर यांनी सहभाग घेतला.