news
clock
नसरापूर घटनेतील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी हीच राज्य सरकारची भूमिका -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, ता. २ -  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नुकत्याच डलेल्या एका तीव्र संतापजनक बालिकेवरील बलात्काराच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकार न्यायालयाकडे विशेष विनंती करणार आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 ही घटना अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी चिमुकली आणि तिच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही जुने संदर्भही तपासात उघड होत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories