कॉकरोच जनता पार्टीचे येत्या गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन
पुणे, ता. ९ - कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) येत्या गुरुवारी (ता. ११) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या आंदोलनात तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पार्टीने केले आहे. हे आंदोलन येत्या गुरूवारी (ता. ११) दुपारी चार वाजता होणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने शनिवारी (६ जून) दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर येथे पहिले आंदोलन केले. या आंदोलनाला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. आम्ही हे आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करणार आहोत, असे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले होते. त्यानुसार कॉकरोच जनता पार्टीने पुढील पाऊल उचलत पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे.