पुणे मेट्रोचा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीसोबत 'ऑटो फीडर' सेवेबाबत करार

पुणे मेट्रोचा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीसोबत 'ऑटो फीडर' सेवेबाबत करार

पुणे मेट्रोचा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीसोबत 'ऑटो फीडर' सेवेबाबत करार 

पुणे, ता. ९ -पुणे मेट्रोने मेट्रो प्रवाशांना मेट्रो स्थानकावरुन इच्छितस्थळी जाण्यासाठी उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्यासोबत 'ऑटो फीडर' सेवेबाबत नुकताच करार केला.

या उपक्रमामुळे प्रवाशांना पुणे मेट्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचणे तसेच स्थानकांपासून इच्छित स्थळी जाणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रोने रॅपिडो या प्रवासी वाहतूक देणाऱ्या संस्थेशीही हा करार केला आहे. 

या करारावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक  श्रावण हर्डीकर (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील (एमएमआय/एचआर) तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, उपाध्यक्ष शुभम तांदळे आणि पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणे हा या कराराचा उद्देश आहे.

 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories