सेंट्रल ऑर्डनन्स डेपो देहूरोड येथील  निवडणुकांमध्ये 'सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल'चा विजय

सेंट्रल ऑर्डनन्स डेपो देहूरोड येथील निवडणुकांमध्ये 'सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल'चा विजय

 सेंट्रल ऑर्डनन्स डेपो देहूरोड येथील  निवडणुकांमध्ये 'सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल'चे घवघवीत यश

कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांच्याकडून नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन 

पिंपरी, ता. ११ - सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) देहूरोड येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या 'सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड (२०२६ - २०३१)' आणि 'सी ओ डी वर्क्स कमिटी (२०२६-२०२८)' या दोन्ही निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये 'सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल'ने (सी ओ डी वर्कर्स युनियन आणि सी ओ डी बहुजन कामगार संघ प्रणित) दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवला. एकूण ११ जागांसाठी ही निवडणूक झाली.

  सी ओ डी संयुक्त कामगार आघाडीची (इंटक युनियन व बी एम एस युनियन प्रणित) या निवडणुकीत पीछेहाट झाली. मंगळवारी (ता. ९) अत्यंत चुरशीच्या वातावरणात आणि कडक शिस्तीत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली.  निवडणूक निर्णय अधिकारी  मुकुंद पवार(उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ६, दापोडी, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली.  

डेपोतील दोन्ही निवडणुका अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याबद्दल डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांनी सर्व कामगारांचे, प्रशासनाचे आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले. नवनिर्वाचित उमेदवारांना शाबासकी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

डेपोतील निवडणूक अध्यक्ष अधिकारी कर्नल अखिलेश कुमार आणि मुख्य निवडणूक अधिकारी मेजर वसंत रंजन यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व चोख पार पडली. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानून नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन केले.


सोसायटीच्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतानाच, "सोसायटीच्या हितालाच नेहमी सर्वोच्च प्राधान्य द्या, आगामी काळात सर्व व्यवहार अतिशय चांगल्या प्रकारे चालवा आणि कामगारांना उत्कृष्ट व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या," अशी महत्त्वपूर्ण सूचना व अपेक्षा यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. सोसायटीचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकुंद पवार,  निवडणूक अधिकारी बाळकृष्ण घुगे  तसेच सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी अत्यंत पारदर्शक व उत्कृष्ट नियोजन केले. याबद्दल डेपोतील सर्व कामगार संघटनांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. डेपो प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था आणि सहकार्य दिल्याबद्दल प्रशासनाचेही आभार मानण्यात आले.

कामगारांच्या एकतेचा विजय....

 "हा विजय डेपोतील कामगारांच्या एकतेचा आणि आमच्या पॅनलवर असलेल्या विश्वासाचा आहे. मतदारांनी दिलेल्या या कौलाचा आदर करून आम्ही सोसायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्यास आणि कामगारांना सर्वोत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार." -  संजय जगदीश डुमडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य - AIDEF, जे सी एम सदस्य सी ओ डी वर्कर्स युनियन


१) सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. निवडणूक (२०२६ - २०३१)  निकाल -

 

अ) सर्वसाधारण प्रवर्ग जागा (एकूण ६ जागा):

  प्रमोद महादेव मलगेकर – ७८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

 कपिल भुजबळ – ७४ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

 शब्बीर इनामदार – ७२ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी 

 अशोक परांडे – ७१ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी - |इंटक)

  विलास जगताप – ६९ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

 बाळासाहेब गुंड– ६९ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी - 

या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:

 व अभिजीत पिसाळ – ६९ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

  किंडरे काळूराम किसन – ६८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

 विकास मोडक – ६८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

  संतोष जाधव – ६९ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

 तानाजी भांडवलकर – ६३ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

  बाळासाहेब शिळवणे – ५८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

ब) महिला राखीव प्रवर्ग जागा (एकूण २ जागा):

 शितल अनिल कुमार कनौजिया – ७७ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

 कोमल प्रवीण आल्हाट– ७६ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:

कामिनी टिळेकर – ६८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी  वंदना बराथे – ६६ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

क) इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्ग जागा (एकूण १ जागा):

 सतिश शिंदे – ७४ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:

 (विकास विधाटे – ६८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

ड) अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) प्रवर्ग जागा (एकूण १ जागा):

 सचिन सदाशिव साळवी – ८० मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:

  चारुदत्त महाडिक – ६६ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)

इ) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (VJNT/SBC) जागा (एकूण १ जागा):

 अहिल्या दीपक दडस – ७३ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)

या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:

 महेंद्र कांबळे – ७१ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)



२) सी ओ डी डेपो कार्य समिती (Works Committee) निवडणूक (२०२६-२०२८) निकाल -


कार्य समितीच्या निवडणुकीत पक्षनिहाय उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:

पॅनल १ : सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल_

  पिल्लई आकाश वासुदेवन – २३१ मते

 डुमडे संजय जगदीश – २२० मते

 भेगडे निलेश हिरामन – २१९ मते

  शितकल संतोष मारुती – २१६ मते

लीळाकर उमाकांत नारायण – २०९ मते

  टाकळे विक्रम बाळासाहेब – २०१ मते

 बलघरे विकास गोविंद – २०० मते

 कुमार मनीष – १९७ मते

  कुमार अमित – १९० मते

 टिळेकर एकनाथ हिरामन – १९० मते


 पॅनल २ : सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी**

 आसबे राहुल पांडुरंग – २२१ मते

  कारेकर निरंजन – २१३ मते

   इनामदार शब्बीर रज्जाक – १९८ मते

  पवार विश्वजीत आर. – १९७ मते

 बुरडे गिरिधर सुदाम – १७४ मते

 नेरकर विलास महादेवराव – १६२ मते

  मठ महेंद्र जी. – १६० मते

  दाभाडे एस. सखाराम – १५७ मते

  झेंडे हिरामन नामदेव – १५३ मते

  लटके महादेव नरहरी १४१










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories