'क्रेडाई' पदाधिकरी व 'पीएमआरडीए'च्या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांवर चर्चा
पिंपरी, ता. 11- पुणे महानगर हद्दीतील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘क्रेडाई’च्या (कन्फेडरेशन ऑफ रिअल एस्टेट डेवलपर्स एसोसिएशंस ऑफ इंडिया) पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली.
यावेळी, आकुर्डी येथील पीएमआरडीए’ मुख्यालयात बैठक झाली.
🔹 या बैठकीत बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती देण्याबाबत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सकारात्मकतेने सोडवले जातील, अशी ग्वाही महानगर आयुक्तांनी याप्रसंगी दिली.
🔹 या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सह-महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांच्यासह ‘क्रेडाई पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष अरविंद जैन, कोषाध्यक्ष अखिल अग्रवाल, निमंत्रक भूषण पालरेषा, समिती सदस्य मनीष कणेरिया, महासंचालक कर्नल कुमार रामचंद्रन, लायझनिंग टीमच्या मनीषा मुरकुटे आदी उपस्थित होते.
🔸 पुणे महानगराच्या शाश्वत आणि सुनियोजित विकासासाठी ‘पीएमआरडीए’ सदैव कटिबद्ध आहे.