निगडी येथून रासायनिक ४०० लिटर विषारी ताडी जप्त,

निगडी येथून रासायनिक ४०० लिटर विषारी ताडी जप्त,

निगडी येथून रासायनिक ४०० लिटर विषारी ताडी जप्त, गुन्हे शाखेच्या दारुबंदी पथकाकडून कारवाई

पिंपरी, ता .९ - अवैध दारु निर्मिती व विक्री विरुध्द कारवाई करताना गोपनीय माहीतीच्या आधारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दारुबंदी पथकास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी भागात क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) या रासायनिक पदार्थाचा वापर करुन कृत्रिम व विषारी ताडी तयार करुन विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली.

तपास  पथकाने त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत छापा टाकला असता  दरम्यान ४०० लिटर रासायनिक भेसळयुक्त विषारी ताड़ी जप्त करण्यात आली.  ताडी निर्मीतीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ व इतर साहीत्यही जप्त करण्यात आले आहे.

सदर ताडी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असुन तिच्या सेवनाने गंभीर शारिरीक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

या कारवाईत आरोपी  १) मौनेश यंकप्पा गुत्तेदार (वय २४ वर्ष रा पोरंडवाल चौक, देहुगाव मुळ रा रायचुर कर्नाटक) व २) लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे )वय २६ रा टि.ही. एस शोरुमचे पाठीमागे, आंबेडकर नगर, देहुगाव मुळ रा ता निलंगा जि लातुर) यांना अटक करुन ‌त्यांच्याविरुध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करीत आहेत.

अवैध दारु निर्मीती व विक्रीविरोधात पिंपरी चिंचवड पोलीसांमार्फत कारवाई यापुढेही कठोरपणे सुरु राहणार असुन नागरिकानी अशा कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पोलीसांना तात्काळ मोनं ७७९८१००११२ या क्रमांकावर कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे , सह पोलिस आयुक्त‌ डॉ. महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त सारंग अव्हाड, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली,  पोलिस उप आयुक्त गुन्हे रोहिदास पवार,  सहा पोलिस आयुक्त, गुन्हे १  डॉ विशाल हिरे,  पोलिस अधिकारी  अनिल मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, दादासो मोरे, सपोफौ राकेश पालांडे, पोह सागर सुर्यवंशी, विक्रांत चव्हाण, शरद गर्जे पोना/सचिन गोनटे, पोलीस अंमलदार उध्दव खेडकर, सुमित देवकर, लक्ष्मीकांत पतंगे, शामसुंदर गुट्टे, मितेश यादव, यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे करीत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories