वाकडमध्ये २ लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

वाकडमध्ये २ लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

वाकडमध्ये २ लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त 

पुणे, ता. ९ - वाकड परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध वाकड पोलिसांनी कारवाई करत सुमारे २ लाख ८ हजार ६१० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ८) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास बजाज ऑटो लक्ष्मी मोटर्सच्या मागे, कस्पटे वस्ती रोड, वाकड येथील पत्र्याच्या चाळीतील खोली क्रमांक २ मध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय ३२, रा. आण्णाभाऊ साठे नगर, वाकड) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत २,०८,६१० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग तसेच इतर गंभीर आजार होऊ शकतात, याची माहिती असूनही आरोपी विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories