दापोडीत लोखंडी गुप्तीसह १८ वर्षीय तरुण ताब्यात; मनाई आदेशाचे उल्लंघन

दापोडीत लोखंडी गुप्तीसह १८ वर्षीय तरुण ताब्यात; मनाई आदेशाचे उल्लंघन

दापोडी | २२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरात सार्वजनिक ठिकाणी लोखंडी गुप्ती बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे पटरीशेजारील गुलाबनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित तरुणाविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश ऊर्फ सनी सुधीर मंडलिक (वय १८ वर्षे, गुलाबनगर, दापोडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

२२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास दापोडीतील सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे, रेल्वे पटरीशेजारील गुलाबनगर परिसरात आरोपी आढळून आला. त्याच्या ताब्यात धारदार गुप्ती असलेले, अंदाजे १०० रुपये किमतीचे शस्त्र असल्याचे पोलिसांना आढळले.

या प्रकरणी आकाश श्रावण सोनवणे, पोलीस शिपाई, बक्कल क्रमांक ३१७१, नेमणूक दापोडी पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने कोणताही वैध परवाना किंवा अधिकार नसताना हे शस्त्र जवळ बाळगले होते. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई करणारा आदेश लागू असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories