दत्तवाडी-आकुर्डी परिसरात १२ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी, ता. २९ - दत्तवाडी-आकुर्डी परिसरात निगडी पोलिसांनी १२ हजारांचा गांजा २१ वर्षीय युवकाकडून जप्त केला आहे. मंगळवारी (ता. २८) ही कारवाई करण्यात आली. युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम अतुल पवार (वय-२१ वर्षे, मजुरी, रा. गांधीनगर, खराळवाडी) याने १२,१०५/- रुपये किंमतीचा २६९ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशिररित्या बाळगला होता. दत्तवाडी-आकुर्डी परिसरात ओढयाच्या बाजूला तो पोलिसांना सापडला.
निगडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.