पुण्यातून काशीला जाणे आता झाले सोपे, बनारस - पुणे 'अमृत भारत एक्सप्रेस'चे उद्घाटन
पुणे, ता. २९ - पुण्यातून आता तीर्थक्षेत्र काशीला जाणे आणि मुंबईतून अयोध्येला जाणे आता अधिक सोपे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात या दोन बनारस ते पुणे व अयोध्या ते मुंबई या दोन 'अमृत भारत एक्सप्रेस' गाड्यांचे उद्घाटन केले.
पंतप्रधान मोदींनी नुकतेच वाराणसीमध्ये ६,३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या दौऱ्यात त्यांनी दोन नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' गाड्यांचे उद्घाटन केले आहे.
बनारस - हडपसर (पुणे) या गाडीमुळे पुणे शहर व परिसरातून काशी विश्वनाथ येथे जाणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच अयोध्या - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही गाडी अयोध्या श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र आणि मुंबईला जोडणारी आहे. या गाडीची सोय झाल्याने असंख्य देशवासियांची अयोध्येला जाण्याची इच्छा सहज पूर्ण होणार आहे.
🛤️ बनारस–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (22589/22590)
✔️ गरीब व मध्यमवर्गीयांसाठी किफायतशीर सेवा
✔️ एकूण 22 डबे (स्लीपर + जनरल)
✔️ 18 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
✔️ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र जोडणारा महत्त्वाचा मार्ग
⏰ वेळापत्रक:
➡️ बनारसहून सायं. 6:15 सुटेल → हडपसर येथे रात्री 12:10 आगमन
⬅️ हडपसरहून सकाळी 7:50 सुटेल → दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 बनारस आगमन
📍 प्रयागराज, झाशी, इटारसी, भुसावळ, मनमाड, अहिल्यानगर, दौंड यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा