news
clock
गोळ्या झाडून व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या ४ आरोपींना अटक, ९ पिस्तूले व ४६ जिवंत काडतुसे जप्त,  गुन्हे शाखा युनिट - १ ची कामगिरी

गोळ्या झाडून व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या ४ आरोपींना अटक, ९ पिस्तूले व ४६ जिवंत काडतुसे जप्त, गुन्हे शाखा युनिट - १ ची कामगिरी

गोळ्या झाडून व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या ४ आरोपींना अटक, ९ पिस्तूले व ४६ जिवंत काडतुसे जप्त,  गुन्हे शाखा युनिट - १  च्या पथकाची कामगिरी 

पिंपरी, ता. ५ -  देहुरोड परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करुन हत्या केल्याच्या घटनेतील ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ देशी बनावटीची पिस्तूले, ४६ जिवंत काडतुसे, ५  मॅक्झिन व २ वाहने असा ८ लाख रुपयांचा शस्त्रसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - १ च्या तपास पथकाने केली आहे.  

व्यापाऱ्याच्या हत्येनंतर पिंपरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस कायदा - कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार  गुन्हे शाखा युनिट - १ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांनी केला. तपासादरम्यान श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांना अवैध शस्त्रसाठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, तपास मोहिम राबवत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी  पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीत सुरु असलेल्या अवैध शस्त्रसाठ्यांवर कारवाईची मोहीम सुरु असतानाच ही व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. या कारवाई दरम्यानच या घटनेची उकल करुन हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त करुन मोठी कामगिरी पार पाडली आहे.

अटक आरोपींची नावे अशी....

१. अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३० वर्षे, डिलीव्हरी बॉय, रा. थेरगाव) 

२. वैभव अशोक शेटे, (वय ३१ वर्षे, सोशल मिडीयावर मॅनेजमेंट, रा. थेरगाव) 

३. सौरभ धनंजय जाधव (वय २७ वर्षे,  ईस्टेट एजंट, रा. पाषाण) 

४. अक्षय अशोक कांबळे (वय ३१ वर्षे, मजुरी, रा. पाषाण) 

 पिंपरी चिंचवडच पोलस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्क पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहाय्यक पोलिस उप निरिक्षक संतोष इंगळे, प्रमोद वेताळ,  हवालदार जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे, देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, महिला पोलिस हवालदार उषा दळे, कॉन्स्टेबल संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उध्दव खेडकर, दिपक तांदळे यांचा या कामगिरीत सहभाग आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories