मुळशी तालुक्यात १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपी आईस्क्रीम विक्रेता पोलिसांच्या ताब्यात
मुळशी तालुक्यात १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपी आईस्क्रीम विक्रेता पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, ता. ६ - लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असताना मुळशी तालुक्यातील एका गावात आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुलीच्या पालकांनी व गावकऱ्यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले आहे व पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपी पिंटू शिवकुमार सध्या (राहणार - सूस (ता. मुळशी) जिल्हा पुणे, मूळ रा. चिधरवापुर जनखत कन्नौजतीरवा, राज्य, उत्तर प्रदेश) हा फिरुन आईस्क्रीम विकणारा विक्रेता आहे. ही मतिमंद मुलगी दुपारी २ च्या सुमारास विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी आपल्या लहान चुलत बहिणीसह गेली होती. आरोपीने मतिमंद मुलीला आईस्क्रीम देत जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केला आणि ती घरी धावत आली. तिने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितली. त्यावेळी आरोपी घटनास्थळाहून दुचाकी घेऊन पळून गेला. पालकांसह ग्रामस्थांनी परिसरात आरोपीचा शोध घेत त्याला शोधून काढले व आरोपीला पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. .
या प्रकरणात, पौड पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद क्रमांक १२३/२०२६ नुसार करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपास सुरू केला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. आरोपीवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी नागरीकांनी केली आहे.
- गुन्हा दाखल, FIR registered, तपास, investigation, गावकरी, villagers, पोलिस कारवाई, police action,
- पौड पोलीस, Paud police, पोक्सो कायदा, POCSO Act
- आईस्क्रीम विक्रेता, ice cream vendor, आरोपी अटक, accused arrested,
- intellectually disabled girl,
- अल्पवयीन मुलगी, minor girl, मतिमंद मुलगी,
- मुळशी, Mulshi, पुणे, Pune, विनयभंग, molestation,