news
clock
महाराष्ट्रात जनगणना सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश लांडगे यांनी केली स्व-गणना

महाराष्ट्रात जनगणना सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश लांडगे यांनी केली स्व-गणना

 महाराष्ट्रात जनगणना सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश लांडगे यांनी केली स्व-गणना 

पुणे, ता. २ - राष्ट्रीय जनगणनेच्या स्व-गणनेचा पहिला टप्पा महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह 'स्व-गणना' पूर्ण केली आणि  नागरिकांनाही स्वगणना करण्याचे आवाहन केले आहे. आमदार महेश लांडगे यांनी शनिवारी (ता. ३) स्वतः आपल्या कुटुंबीयांसह ऑनलाइन पद्धतीने स्व-गणना पूर्ण केली. 

आमदार लांडगे म्हणाले की, ''ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असून प्रत्येक नागरिकाचा सहभाग यामध्ये मोलाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची डिजिटल गणना पूर्ण करून राज्याला आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्रभरातील जनतेने १ ते १५ मे या कालावधीत se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरावी आणि आपली जबाबदारी पार पाडावी.''

''देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक माहिती असणे ही काळाची गरज आहे. १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या निमित्ताने प्रथमच आपल्याला ‘डिजिटल स्व-गणने’ची संधी मिळाली आहे. मी माझे कर्तव्य पार पाडले आहे, तुम्हीही आजच आपली नोंदणी पूर्ण करा आणि जबाबदार नागरिकत्वाचा परिचय द्या. आपली जनगणना, आपला विकास... हा मंत्र केवळ शब्द नसून ती आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. चला, डिजिटल जनगणनेत सहभागी होऊन सशक्त भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया.'' असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी सुरज टिंगरे, किरण गव्हाणे, अरुण गुंडगळ, राहुल शेडगे उपस्थित होते.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories