तडीपार व घातक शस्त्र बाळगण्यास मनाई  आदेशाचा भंग करुन धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणाला अटक

तडीपार व घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करुन धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणाला अटक

 तडीपार व घातक शस्त्र बाळगण्यास मनाई  आदेशाचा भंग करुन धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, ता. २६ - तडीपार आदेशाचा भंग करुन तसेच घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन करुन धोरदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला सोमवारी (ता. २५) नेहरुनगर-पिंपरी येथील एच. एच. मैदानात अटक केली आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश गोरख माने (वय ३१, रा.विटकर चाळ, नेहरुनगर, पिंपरी) याला पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या तडीपार आदेशाचा भंग करुन त्याने बेकायदेशीररीत्या आयुक्तालय हद्दीत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार लागू असलेल्या घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचेही त्याने उल्लंघन करुन त्याने सुमारे ४०० रुपये किंमतीचा धारदार लोखंडी कोयता बाळगल्याचे आढळले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीवर संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. २५) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२,३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories