किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांची पती-पत्नीला जबर मारहाण

किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांची पती-पत्नीला जबर मारहाण

किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांची पती-पत्नीला जबर मारहाण

पिंपरी, ता. २६ - किरकोळ कारणावरुन एका शेजाऱ्याने आपल्या शेजारच्या पती-पत्नीला बांबूने जबर मारहाण केली. हा प्रकार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तवाडी येथे रविवारी (ता. २४) घडली. आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेले गोकुळ भागवत कुंभार (वय ४३ वर्षे, ड्रायव्हर, रा. दत्तवाडी ता. मुळशी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी नंदकिशोर मिश्रा (वय २८ वर्षे, रा. दत्तवाडी ता. मुळशी) व त्यांचा मेव्हणा (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी  कुंभार यांन्या शेजारी आरोपी राहतात. कुंभार यांनी  आरोपींना 'घराचा कलर सावकाश दया' असे म्हटले. या कारणावरुन आरोपींनी कुंभार यांना त्यांनी शिवीगाळ करुन लाकडी बांबुने व दगडाने मारले.  कुंभार यांच्या पत्नीचा दात पाडला व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रही तोडले आहे. 

या प्रकरणी आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२),११७(२), ३५२,३५१ (२), ३२४(४) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories