स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शहरात 'फिरते ग्रंथालय' सुरु,  निगडी रोटरी क्लबकडून मंडळाला ग्रंथालयासाठी वाहन हस्तांतरित

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शहरात 'फिरते ग्रंथालय' सुरु, निगडी रोटरी क्लबकडून मंडळाला ग्रंथालयासाठी वाहन हस्तांतरित

 स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शहरात 'फिरते ग्रंथालय' सुरु,  निगडी रोटरी क्लबकडून मंडळाला ग्रंथालयासाठी वाहन हस्तांतरित

पिंपरी, ता. १३ - निगडी-प्राधिकरणाील  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये 'फिरते ग्रंथालय' (Books On Wheels) सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडी व अग्सा स्प्रींग्ज यांच्या माध्यमातून मंडळाला मोठे वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनाचा हस्तांतरण समारंभ नुकताच झाला.  

या प्रसंगी ग्रंथप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर पाहुणे, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच सावरकर मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती पूजन, मान्यवरांचा सत्कार, ग्रंथालयाच्या कार्याचा परिचय आणि दस्तऐवज हस्तांतरण असा कार्यक्रम झाला. नागरीकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

प्रास्ताविकात प्रशांत पेडणेकर यांनी फिरत्या ग्रंथालयाच्या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष केशव मनगे व  अग्सा स्प्रींग्ज संस्थेचे कंपनीचे संचालक अरविंद खंडकर यांनी मनोगत व्यक्त केले.  फिरते ग्रंथालय हा उपक्रम पुस्तकांना वाचकांच्या दारी नेणारा एक अभिनव प्रयत्न असून, समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या उपक्रमामुळे "घराघरांत पुस्तक, प्रत्येक मनात विचार" हे स्वप्न साकार होण्यास नवी दिशा मिळाली आहे, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. फिरत्या ग्रंथालयाद्वारे विविध कार्यक्रमांमधून वाचन संस्कृतीचा प्रसार आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प  करण्यात आला.

 स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे व सचिव अॅड. हर्षदा पोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुप्रिया होनप यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वास करंदीकर यांनी आभार मानले. मंडळाने सुरु केलेल्या या फिरत्या ग्रंथालयाच्या वाहनाची अंतर्गत रचना अतिशय सुंदर आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories