घराचा दरवाजा उघडून साडेतीन लाखांचे दागिने चोरट्याने केले लंपास, रुपीनगर-तळवडेमधील घरफोडी
घराचा दरवाजा उघडून साडेतीन लाखांचे दागिने चोरट्याने केले लंपास, रुपीनगर-तळवडेमधील घरफोडी
पिंपरी, ता. ९ - घराचा दरवाजा उघडून चोरट्याने ३ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने एका घरातून चोरले होते. ही घटना २९ व ३० मे रोजी रुपीनगर-तळवडे येथे घडली होती. या प्रकरणी सोमवारी (ता. ८) आरोपीविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, राकेश सरदार बिराजदार (वय ३९ वर्षे, नोकरी, रा. रुपीनगर तळवडे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोमिन युसुफ तांबोळी (वय २६ वर्ष, रा. रुपीनगर, तळवडे) असे आहे. आरोपीने फिर्यादी बिरजदार यांच्या घराचा वरचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि तब्बल ३,६८,०००/-रुपयांचे एकूण ४ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले.
चिखली पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- घरात चोरी, House Theft, दागिने लंपास, Jewellery Stolen, आरोपी अटक, Accused Arrested
- चिखली पोलीस, Chikhali Police, मोमिन युसुफ तांबोळी, Momin Yusuf Tamboli, राकेश सरदार बिराजदार, Rakesh Sardar Birajdar
- , घरफोडी, House Break-in, चोरी, Theft Case, सोन्याचे दागिने चोरी, Gold Jewellery Theft,
- रुपीनगर तळवडे घरफोडी, Rupinagar Talawade Burglary, पिंपरी-चिंचवड गुन्हे, Pimpri Chinchwad Crime