मोशी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

मोशी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

मोशी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

मोशी, ता. १० - भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खंडेवस्ती भोसरी येथे बुधवारी (ता. १०)  घडला आहे. आरोपी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबात, पांडुरंग एकनाथ कुचेकर (वय ३५ वर्षे, खाजगी नोकरी रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक नामे सुंदर पंढरीनाथ गवळी (वय-२६ वर्षे, रा. ममता चौक, दिघी) हा निष्काळजीपणे कंटेनर चालवत होता. कुचेकर यांचे वडील त्यांची नातेवाईक सविता दयानंद कांबळे (वय ३० वर्षे) यांना इंडियन ऑयल काजळे पेट्रोल पंप मोशी जवळून आदर्शनगर येथील घरी घेऊन जात होते. तेव्हा कंटेनरने फिर्यादीच्या वडिलांच्या दुचाकीला धडक दिली. 

या अपघातात कुचेकर यांच्या वडिलांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. कुचेकर यांची  बहिण सविता कांबळे यांचा मृत्यू झाला. आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम, १०६ (१),२८१, १२५ (बी) सह मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories