पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ तरुणाला लुटले, मोबाईल व रोकड लंपास

पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ तरुणाला लुटले, मोबाईल व रोकड लंपास

 पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ तरुणाला लुटले, मोबाईल व रोकड लंपास

पिंपरी, ता. १० - पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात ‘काम आहे’ असे सांगून एका तरुणाला अडवून मारहाण करत त्याच्याकडून मोबाईल व रोकड लुटल्याची घटना ९ जूनला मध्यरात्रीनंतर घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २० वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी तोहीद मुन्ना शेख (वय २२, रा. तथागत हौसिंग सोसायटी, डिलक्स चौक, पिंपरी) याने फिर्याद दिली आहे. तोहीद ९ जून २०२६ रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास भारतनगर, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ होता. तेव्हा आरोपी यश चंद कांबळे (वय २०, रा. रेल्वे पटरी शेजारी, भारतनगर, पिंपरी) याने इतर दोन साथीदारांसह ‘काम आहे’ असे सांगून त्यांना थांबवले. त्यानंतर फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. फिर्यादी तोहीदच्या  खिशातून रुपये १५,००० किमतीचा Realme कंपनीचा मोबाईल फोन आणि रुपये ७०० रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेले. 

आरोपींपैकी यश कांबळे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १०) भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories