news
clock
अनधिकृतपणे राहणाऱ्या भाडेकरुंच्या घरमालकांविरुद्ध ३८ गुन्हे दाखल, पोलिसांची शोधमोहिम

अनधिकृतपणे राहणाऱ्या भाडेकरुंच्या घरमालकांविरुद्ध ३८ गुन्हे दाखल, पोलिसांची शोधमोहिम

अनधिकृतपणे राहणाऱ्या भाडेकरुंच्या घरमालकांविरुद्ध ३८ गुन्हे दाखल, पोलिसांची शोधमोहिम

सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरुंची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक आहे. तरीही शहरात कोणी बांगलादेशी इसम अनधिकृतपणे राहत आहेत का याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेत अनधिकृतपणे राहणाऱ्या भाडेकरुंच्या घरमालकांविरुद्ध ३८  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   

अनधिकृत भाडेकरुंची ही शोधमोहिम  दहशतवाद विरोधी शाखा (ATB) व पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष (ATC)यांच्यामार्फत राबविण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक आहे. तसे आदेशही पोलिस आयुक्तांकडून दिले जातात. अनधिकृतपणे राहणाऱ्या भाडेकरुंच्या ३८ घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   

सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरुंची माहिती व कागदपत्रे घेवून त्यांची पडताळणी करणेसाठी जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असून सदर भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल. आपल्या नजीक कोणी बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्यास किंवा एखादा संशयित इसम आढळून आल्यास त्याबाबत माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, चिंचवड येथे दहशतवाद विरोधी शाखा (ATB) येथे आपण देवू शकता. माहिती देणाऱ्या इसमांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. येते 

अनधिकृत भाडेकरुंची शोधमोहिम  पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा (ATB) व पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष (ATC) यांनी राबवली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories