ऑनलाइन खरेदीच्या करताना महिलेची ९५ हजारांची फसवणूक, निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
May 02 2026
15
ऑनलाइन खरेदीच्या करताना महिलेची ९५ हजारांची फसवणूक, निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २ आकुर्डी परिसरातील एका महिलेची ऑनलाइन खरेदीदरम्यान ९५,००० रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना २६ एप्रिल २०२६ रोजी घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात शुक्रवारी (ता. १) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ‘मीशो’ अॅपवरून ऑनलाइन खरेदी करत होत्या. मात्र ऑर्डर प्लेस न होता त्यांच्या खात्यातून पैसे कट झाले. यानंतर त्यांनी गुगलवरून संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक शोधून फोन केला असता, समोरील व्यक्तीने त्यांना एक अज्ञात व्हॉट्सअॅप नंबर देऊन त्यावर संपर्क साधण्यास सांगितले.
त्या नंबरवरील इसमाने फिर्यादी यांना मोबाईल आणि व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये काही बदल करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण ९५,००० रुपये अनधिकृतपणे वळते करण्यात आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अज्ञात आहे. तसेच ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम वळती झाली त्या खातेदारांचाही तपास सुरु आहे.