बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुण अटकेत, शस्त्रबंदी व तडीपार आदेशाचे उल्लंघन
Apr 25 2026
37
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुण अटकेत, शस्त्रबंदी व तडीपार आदेशाचे उल्लंघन
पिंपरी, ता. २५ - बावधन परिसरात बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणास बावधन पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संबंधित आरोपीने लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशासह तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजता मुकाईवस्ती, बावधन (ता. मुळशी, जि. पुणे) परिसरात करण्यात आली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सुरेश गोणते (वय २४, रा. अतश्री समर्थ पूर्वा सोसायटी, फ्लॅट नं. ४०१, दौलत पेट्रोल पंपामागे, भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या शस्त्रबंदी आदेश (कलम ३७(१)) लागू असतानाही आरोपीने त्याचे उल्लंघन करून शस्त्र बाळगल्याचे समोर आले आहे. याशिवाय, आरोपीवर यापूर्वी तडीपार आदेश (कलम ५५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम) लागू असतानाही तो आदेशाचे उल्लंघन करून कार्यक्षेत्रात आढळून आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.