पिंपरी-चिंचवड पोलिसांची शहरात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाई
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे -
१) तळेगाव दाभाडे परिसर -
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घोरावाडी रेल्वे स्टेशनच्या लगत एका झाडाखाली १०८० रुपयांची हातभट्टीची दारु पोलिसांनी ५९ वर्षीय इसमाकडून जप्त केली. बबन शंकर गायकवाड (वय ५९ वर्षे, रा. शेलारवाडी, ता. मावळ) याने ही दारु विनापरवाना विक्रीसाठी बाळगली होती. पोलिसांनी आरोपी गायकवाडला अटक केली आहे. आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३ व महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) तळेगाव दाभाडे परिसर -
तळेगाव स्टेशन ते डिमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका २८ वर्षीय युवकाकडून पोलिसांनी देशी-विदेशी दारूच्या १२३ बाटल्या जप्त केल्या. या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उत्तम खिलारे (वय २८ वर्षे रा. मावळ लॅन्ड सोसायटी, तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पॉवर लाईम पंच कंपनीच्या देशी दारुच्या ९० मिलीच्या १०० बॉटल व विदेशी दारुच्या वेगवेगळ्या प्रकारच्या २३ बॉटल असा एकण ८१८५/- रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या विक्रीसाठी बाळगल्या होत्या. या बाटल्या तो रिक्षा मधून विक्रीसाठी नेत होता.
आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) चाकण परिसर -
चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी फाटा कमानीजवळ सोमवारी (ता. ८) पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणांकडून पॉवर लाइम पंच कंपनीच्या दारूच्या २०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. ही दारू बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
रामेश्वर नाथा गंगाधर (वय ३४ वर्षे, रा. योगीराज चौक, देहफाटा, आळंदी) असे अटक आरोपीचे नाव अटक आहे. आरोपी रामेश्वर हा दुचाकीवर ८०००/- रुपये किंमतीच्या पॉवर लाइम पंच कंपनीच्या दारूच्या २०० सीलबंद बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात होता.
आरोपीवर चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४) आकुर्डी परिसर -
निगडी पोलिस ठाण्याचे हद्दीत आकुर्डी
येथे बेकायदेशीररित्या दारूचा साठा करणाऱ्या ६० वर्षीय पोलिसांनी इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वपन गुरुदास बिस्वास (वय ६० वर्षे, रा. आकुर्डी गावठाण) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने 6000 रुपयांची दारू बाळगली होती.
आरोपीवर निगडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५) सांगवी परिसर -
सांगवी पोलिसांनी विशालनगर परिसरात दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करत एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपती चौक, विशालनगर येथे आरोपी ऑकार शशिकांत जाधव (वय २३, रा. नंददीप कॉलनी, नढेनगर, काळेवाडी, पुणे; मूळ रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) हा होंडा अॅक्टिव्हा (एमएच १४ जेक्यू ७८९४) या दुचाकीवरून अंदाजे ५ हजार ३४० रुपयांचा दारूबंदीतील मद्यसाठा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आला.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या संबंधित कलमान्वये सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रात्री ८.१३ वाजता नोंदविण्यात आला.
६) म्हाळुंगे परिसर -
म्हाळुंगे (ता. खेड) येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मैफिल हॉटेलच्या मागील परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी प्रणव गजानन कडू (वय १९, रा. भैरवनाथ नगर, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. चौसाळा, जि. अमरावती) हा विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करताना आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ हजार ३२० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने ही दारू वाघजाईनगर, खराबवाडी येथील पुना वाईन्समधून विक्रीसाठी खरेदी केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७) निगडी परिसर -
संभाजीनगर परिसरात अवैधरीत्या विदेशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (८ जून) दुपारी सुमारे १२.५० वाजण्याच्या सुमारास शांतीनिकेतन हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, निगडी येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश श्रीधर पुजारी (वय ४४, रा. पोलाईट होम्स, फ्लॅट क्र. ११, म्हेत्रे वस्ती, चिखली, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा हिरो ड्युएट मोपेड (एमएच १४ एचआर ७७८२) वरून सुमारे ४ हजार ९४८ रुपये किमतीची विदेशी दारू व बिअर बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप गोरखनाथ गोडांबे (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
८) हिंजवडी परिसर -
हिंजवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास जीजाई निवासाजवळ, कोयते वस्ती, पुनावळे येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिश बलराम रास्ते (वय २७, रा. कोयते वस्ती, पुनावळे) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या सुमारे ३३ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ३,३०० रुपये आहे.
चौकशीदरम्यान सदर दारू नागवती बलराम रास्ते हिच्याकडून आणल्याचे आरोपीने सांगितले. याप्रकरणी पोलिस शिपाई रवि प्रकाश पवार (गुन्हे शाखा, युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांच्या फिर्यादीवरून ८ जून रोजी रात्री ११.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात आरोपींना नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.