दुबई, थायलंड येथे सायबर रॅकेट चालवणाऱ्या आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला बँकॉकमधून रेड कॉर्नर नोटिसव्दारे अटक

दुबई, थायलंड येथे सायबर रॅकेट चालवणाऱ्या आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला बँकॉकमधून रेड कॉर्नर नोटिसव्दारे अटक

 दुबई, थायलंड येथे सायबर रॅकेट चालवणाऱ्या आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला बँकॉकमधून रेड कॉर्नर नोटीसव्दारे अटक

पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने दुबई, थायलंड येथे सायबर रॅकेट चालवणाऱ्या आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला थायलंड बँकॉक येथून रेड कॉर्नर नोटीसव्दारे अटक केली आहे. लुक आऊट सर्क्युलरच्या आधारे या गुन्हेगाराला थायलंडच्या बँकॉक विमानतळावर ताब्यात घेऊन भारतात आणले आहे. सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे अटक आरोपीचे नाव आहे. 

असा झाला पर्दाफाश - देहूरोड पोलिस ठाण्यात ऑनलाईन टास्क फसवणूक, हिंजवडी पोलिस ठाण्यात शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक रुपये १८ लाखांची फसवणूक, सायबर पोलिस ठाण्यात शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक रुपये २ कोटी ६६ लाख फसवणुक हे गुन्हे दाखल होते. देहूरोड पोलिस ठाण्यातील ऑनलाईन टास्क फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास देहूरोड पोलिसांकडून सुरु असताना सायबर पोलिसांनी जून २०२४ मध्ये एकूण १३ आरोपींना अटक केली होती. या आरोपींची चौकशी केली असता दिपक गाडे हा आरोपी दुबई येथे जाऊन सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला भेटला होता. त्याने गणेश काळे याला भारतातील विविध बँक खात्यांची माहिती (एटीएम, चेकबुक, बॅंक अकाउंट लिंक मो.नंबर, इंटरनेट बँकीग आयडी, पासवर्ड)  पाठवली होती व  त्याबदल्यात पैसे स्विकारले होते. या गणेश काळे ने सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी  दुबईमध्ये मुख्य कार्यालय सुरू केले होते.

सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासात गणेश काळे याच्याबाबत महत्त्वाची माहिती गोळा प्राप्त झाली. तो भारतातील वेगवेगळ्या व्यक्तींकडून बँक खाती मिळवायचा आणि त्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमधून आलेला पैसा वळवण्यासाठी (पैसे स्वीकारण्यासाठी) करत असे.

तो चीन (China) आणि इतर परदेशी नागरिकांच्या थेट संपर्कात होता. तो त्यांच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना टास्क फ्रॉड (Task Fraud) शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड (Share Market Fraud) आणि डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) याद्वारे लोकांना लुटायचा.  हिंजवडी पोलीस ठाणे व सायबर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांमध्येही सक्रिय असल्याचे भक्कम पुरावे मिळाले. सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी गणेश काळे हा दुबई सोडून बँकॉक, थायलंड येथे पळून गेल्याची खात्रीशीर माहिती सायबर पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) आणि एलओसी (Lookout Circular - LOC) जारी करून घेतली.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून, आरोपी गणेश काळे हा थायलंडमधून दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. दिनांक ११ जूनला मुंबई विमानतळावर सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस हवालदार  हेमंत खरात आणि पोलिस शिपाई  नितेश बिचेवार यांच्या पथकाने त्याचा अधिकृत ताबा घेतला. आरोपीला देहूरोड पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.

आरोपी गणेश काळे याच्या अटकेमुळे इतरही अनेक गुन्हे उघडकीस आले असुन ते गुन्हे खालीलप्रमाणे -

१. नोडल सायबर पोलीस ठाणे मुंबई

२. मालवणी पोलीस ठाणे, मुंबई 

३. सायबरबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा राज्य 

४. सायबरबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा राज्य 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories