दक्षिण महाळुंगे परिसरातील अवैद्यरित्या सुरु असेलला हातभट्टी दारुविक्री अड्डा पोलिसांनी हटवला
दक्षिण महाळुंगे परिसरातील अवैद्यरित्या सुरु असेलला हातभट्टी दारुविक्री अड्डा पोलिसांनी हटवला
पिंपरी, ता. १२ - दक्षिण महाळुंगे परिसरातील अवैद्यरित्या सुरु असेलला हातभट्टी दारुविक्री अड्डा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) हटवला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय क्षेत्रातील अवैद्य हातभट्टया बंद करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग व एमआयडीसी विभाग असे संयुक्त कारवाई करुन खालील नमुद आरोपींची अवैद्य हातभाट्टी दारु विक्रीची ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने पाडून कायमची नष्ट केली. परिमंडळ - ४ च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, महाळुंगे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ दक्षिण महाळुंगे यांच्या सूचनेप्रमाणे दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीमध्ये हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या सराईत आरोपींवर कारवाई केली.
दारुअड्डा चालवणाऱ्या आरोपींची नावे -
१. दुरेश रमेश राठोड (सिंग्मा चौक, महाळुंगे, ता. खेड)
२. लखन जडजा शिंदे (सिंग्मा चौक, महाळुंगे, ता. खेड)
३. पुष्पादेवी शांतीलाल जाट (हिंदुस्थान पेट्रोल पंप तळवडे ब्रिज निघोजे ता. खेड)
४. लखन हाजुरीया ठाकुर (डी के चौक कुरुळी, ता. खेड)
५. उदय अशोक कलाल (एच पी पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड)
६. सुश्मिता बंडु हितेज (सुभाषावाडी निघोजे, ता. खेड)