news
clock
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन गरजेचे -  डॉ. महेश भागवत

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन गरजेचे - डॉ. महेश भागवत

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन गरजेचे -  डॉ. महेश भागवत

पिंपरी, ता. २५ - ''स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना चालू घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी दररोज वृत्तपत्रांचे बारकाईने वाचन करण्याची गरज आहे. पाठ्यक्रमासोबतच अवांतर वाचन सातत्याने सुरु ठेवावे. जर स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर आपल्याकडे प्लॅन बी तयार असला पाहिजे.'', असा मौलिक सल्ला  तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये डॉ. महेश भागवत यांनी नुकतेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन भागवत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories