news
clock
'क्यू-आर कोड' स्कॅन करा आणि पटपट तिकीट काढा, 'पीएमपी'ने सुरु केली नवीन पद्धत

'क्यू-आर कोड' स्कॅन करा आणि पटपट तिकीट काढा, 'पीएमपी'ने सुरु केली नवीन पद्धत

'क्यू-आर कोड' स्कॅन करा आणि पटपट तिकीट काढा, 'पीएमपी'ने सुरु केली नवीन पद्धत

पुणे, ता. २५ - 'पीएमपी'ने ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अॅपद्वारे तिकीट काढता येते आणि अनेकजण क्यू आर कोड स्कॅन करुन तिकीट काढतात. मात्र, त्यासाठी कंडक्टरकडे असलेल्या तिकीट मशीनवर घ्यावा लागतो. त्यासाठी कंडक्टरला गर्दीतून प्रवाशांपर्यंत येऊन मशीनमधील क्यूआर कोड दाखवावा लागतो. ही पद्धत गैरसोयीची होती. त्यामुळे यावर पीएमपी नवीन पद्धत लागू करत आहे. ती म्हणजे, बसमध्ये आसनांच्या मागे 'क्यू आर कोडचे स्टीकर' चिकटवले आहे. हा क्यू आर कोड स्कॅन करुन अॅपद्वारे काही क्षणात तिकीट काढता येईल. 

आपली पीएमपीएमएल हे अॅप कार्यान्वित आहे. पण, अजूनही असंख्य प्रवाशांना या अॅप्लिकेशनच्या वापराबाबत माहिती नाही. अॅपबद्दल जनजागृती वाढवून प्रवास आधुनिक करण्यासाठी पीएमपी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी हे क्यू आर कोडचे स्टीकर लावण्यात आले आहेत. बसमधील आसनांच्या पाठीमागे हे क्यू आर कोडचे स्टीकर्स प्रवाशांना दिसतील. 

 पीएमपीच्या 927 बसेसमध्ये एकूण 28, 305 क्यूआर कोड स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. स्वारगेट, कात्रज, वाघोली, बाणेर, चाकण, बालेवाडी, हिंजवडी-माण, अप्पर इंदिरानगर, भेकराईनगर आणि शेवाळेवाडीसह 10 प्रमुख बस डेपोंमधून सुटणाऱ्या बसेसमध्ये ही स्टिकर्स लावण्यात आली आहेत. आता उर्वरित बसेसमध्येही स्टीकर्स लावण्यात येत आहेत. 

ऑनलाईन तिकीट प्रक्रियेद्वारे तिकीट काढण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ आहे. प्रवाशांनी या पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन 'पीएमपी'ने केले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories