कासारसाई येथील नदीवरील पूल धोकादायक, १८ जूनपासून जड वाहनांची वाहतूक बंद

कासारसाई येथील नदीवरील पूल धोकादायक, १८ जूनपासून जड वाहनांची वाहतूक बंद

कासारसाई येथील नदीवरील पूल धोकादायक, १८ जूनपासून जड वाहनांची वाहतूक बंद 

पिंपरी, ता. १७ - कासारसाई येथील नदीवरील मोठा पूल धोकादायक झाल्याने या पुलावरील जड वाहनांची वाहतूक १८ जूनपासून पुढील आदेश लागू  होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. या पुलावरुन केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.

जड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला हा पूल मुळशी तालुक्यातील पिंरगुट, घोटावडे, माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई, चांदखेड, उर्से रस्ता या मार्गावर आहे. 

हा पूल धोकादायक झाला असल्याने कुंडमळा पूल दुर्घटनेसारखी दुर्घटना घडू नये यासाठी हा पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

 त्यानुसार,  कासारसाई चौकमार्गे व दत्तवाडी नेरे चौकमार्गे कासारसाई पुलावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अजवड वाहनांच्या वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे. सदर मार्गावरील वाहने साखर कारखाना दारुंब्रे सांगवडे जांबे नेरे दत्तवाडी मार्गे ये-जा करतील. हिंजवडी, देहूरोड वाहतुक विभाग अंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories