news
clock
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारजी मंजुरी

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारजी मंजुरी

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारजी मंजुरी

पुणे, ता. २३  - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, त्यानुसार आवश्यक असलेली ४१ हजार ५१७ चौरसमीटर जागेवर रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने तब्बल २७६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. पुढील एका महिन्यात ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. 

पुणे महापालिकेने २०१७ मध्ये कात्रज ते खडीमीशन चौक या ३.५ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी  भूमिपूजन केले. मात्र, विविध कारणामुळे हा प्रकल्प रखडला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने 

जागामालकांशी चर्चा करुन त्यांना रोख स्वरुपात मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निवडा करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आणि ४१ हजार ५१७ चौरस फुटांची जागा ताब्यात घेण्यास मान्यता मिळाली आहे. आता, १५ दिवसात मोबदल्याचे वाटप सुरु होईल. त्यानंतर टप्पाटप्प्याने पुढील महिन्याभरात ४१ हजार ५१५ चौरस मिटर इतकी जागा ताब्यात घेतली जाणार आहे.  

याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, "कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठीचा तिढा सुटावा यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर हा रस्ता ५० मिटर रुंद होऊन या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे."


थोडक्यात माहिती ....

रस्त्याची लांबी - ३.५ किलोमीटर

एकूण रुंदी - ८४ मिटर

पहिल्या टप्प्यातील रुंदी - ५० मीटर

टीडीआर, एफएसआयने ताब्यात आलेली जागा २९ हजार चौरस मिटर

रोख मोबदल्याने ताब्यात येणारी जागा ४१,५१७ चौरस मिटर

भूसंपादनासाठी येणारा खर्च २७६ कोटी रुपये


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories