कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण विरोधी कारवाईत अडथळा आणणाऱ्या ३३ जणांना अटक
पिंपरी, ता. १० - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'क' व 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर मंगळवारी (ता. ९) पहाटे महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी धडक कारवाई केली. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात पार पडली. मात्र, या कारवाईला विरोध करत काही लोकांनी दगडफेक करुन कारवाईत अडथळे आणले. तीन अल्पवयीन गुन्हेगारही यात सामाल होते. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एकूण ३३ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ९) पहाटे कुदळवाडी-चिंखली परिसरात अनधिकृत मंदीर, मस्जीद तसेच धार्मिक स्थळांचे निष्कासनाची कारवाई सुरु असताना आरोपी नाजीम नईम चौधरी (वय २६ वर्षे, रा. जाधववाडी, चिखली) व इजाज वकार चौधरी (वय २६ वर्षे, रा. जाधववाडी, चिखली) यांनी त्यांच्यासोबत ३०० ते ५०० लोकांचा जमाव जमवून दगडफेक केली व शासकीय कामात अडथळा आणला. या दगडफेकीत फिर्यादी पोलिस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदार जखमी झाले तसेच सरकारी वाहन क्रमांक एम.एच.१२. व्हीसी.८१४८ तसेच इतर वाहनांचे नुकसान झाले आहे.
आरोपींवर चिखली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, सार्वजनिक मालमत्ता अधिनियम १९८४ चे कलम ३ व ७प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान कलम ३५३, १४३, १४५, १४९, १५१, ४२७ प्रमाणे आणि आणखी काही कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी नाजीम नईम चौधरी व इजाज वकार चौधरी यांना गुरुवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अटक आरोपींची नावे - १) नाजीम नईम चौधरी वय २६ वर्षे, राह. ऐश्वर्यम हमारा, जाधववाडी, चिखली
२) इजाज वकार चौधरी वय २६ वर्षे, राह. अक्सा एम्पायर, मोशी रोड, जाधववाडी चिखली
त्यांच्यासोबत
३) मोहम्मद उस्मान हुसेन इंद्रिसी वय २६ वर्षे रा.पुर्णानगर चिखली
४) अब्दुल रहमान सरवर अली इंद्रसी वय २६ रा कुदळवाडी चिखली
५) आजम फकरुद्दीन रज्जाक वय १९ रा.मोरेपाटील चौक चिखली
६) मोहम्मद आसीफ हबीबुर रेहमान इंद्रिसी वय १८ रा. मोरे पाटील चौक कुदळवाडी
७) नसरूद्दीन अब्दुल हमीद सिदधीकी वय २० वर्षे रा कुदळवाडी चिखली
८) रफिक शकील शेख वय ३५ वर्षे रा. कुदळवाडी चिखली
९) शाही आलम अफजल सिद्धीकी वय २४ वर्षे रा. कुदळवाडी चिखली
१०) साहिल अन्सारी शेख वय ३० वर्षे रा. कुदळववाडी चिखली
११) गुलाम हुसैन मैनुल्लाह खान वय १९ वर्षे रा. कुदळववाडी चिखली
१२) निजाम हुसैन नायाब हुसैन सिद्धीकी वय २२ वर्षे रा. कुदळववाडी चिखली
१३) अब्दुल करीम अली मुल्ला चौधरी वय ३५ वर्षे रा. जाधववाडी चिखली
१४) रामदेव परमात्मा प्रताप पांन्डे वय ४८ वर्षे रा. रा. कुदळववाडी चिखली
१५) फैजन नियाल चौधरी वय २६ वर्षे रा रा कुदळववाडी चिखली
१६) युसुफ खुर्शिद आलम चौधरी वय २३ वर्षे रा. मोरेपाटील चौक कुदळवाडी
१७) अकदस बरकत अली खान वय १८ वर्षे रा. जाधववाडी चिखली
१८) अब्बु सोफिया चौधरी वय ३२ वर्षे रा. रा. कुदळववाडी चिखली
१९) नसिम अहम्मद इंद्रिसी वय १९ वर्षे रा. मोरेपाटील चौक चिखली
२०) मोहम्मद नवाज मोहम्मद अली खान वय ३४ वर्षे रा. रा. कुदळववाडी चिखली
२१) कयामुद्दीन सिराजउद्दीन चौधरी वय २२ वर्षे रा. हरगुडेवस्ती चिखली
२२) मोहम्मद कासिम मेहफुज अलम चौधरी वय २४ वर्षे रा. कुदळववाडी चिखली
२३) फय्यज फत्तेह खान वय २८ वर्षे रा.सेक्टर १६ चिखली
२४) मकसूद मंजुर चौधरी वय २१ वर्षे रा. मोरेपाटील चौक चौधरी
२५) मेहफुज मंजुर चौधरी वय २६ वर्षे रा. मोरे पाटील चौक चौधरी
२६) आकाश रामविलास सुर्यवंशी वय २१ वर्षे रा. मोइ गाव चिखली
२७) जुनेद मज्जीद बेग वय २० वर्षे रा कुदळववाडी चिखली
२८) मुराद मजीद बेग वय ३४ वर्षे रा. कुदळववाडी चिखली
२९) आरिफ वासउली इंद्रिसी वय ३८ वर्षे रा.जाधववाडी चिखली
३०) अभिनंदन निरज कुमार यादव वय १८ वर्षे रा. अष्टविनायक चौक चिखली
३१) इलियास बासु तांबोळी वय ४४ वर्षे रा. पिंपरी पुणे
३२) शादाब नौशाद मोमीन वय ३३ वर्षे रा. सेक्टर २७ निगडी
३३) शाबाद मोहम्मद सय्यद वय ३१ वर्षे रा. कुदळवाडी चिखली