ज्येष्ठ पत्रकार मधुकर जोशी यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान
पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंगळवारी (ता. ५) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत माजी नगरसदस्य, ज्येष्ठ पत्रकार तसेच लेखक मधुकर दामोदर जोशी यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सार्वजनिक जीवनात तसेच पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून जोशी काकांना गौरवण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे तसेच महापालिकेचे पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी, जोशी काकांनी मनोगत व्यक्त केले. शहारातीलआणि महापालिका भवनाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.