महामेट्रो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीकडून पीसीएमसी मेट्रो स्थानकाच्या आवारात ‘शेअर्ड फीडर ऑटो सेवेचा प्रारंभ

पिंपरी, ता. १० -  महामेट्रो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे ‘शेअर्ड फीडर ऑटो सेवा’नुकतीच सुरु करण्यात आली.

 या उपक्रमामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे तसेच स्थानकापासून त्यांच्या इच्छित स्थळी जाणे अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे.

मेट्रो प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही सेवा फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रसंगी महामेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील (एमएमआय/एचआर), रिक्षा पंचायतचे पदाधिकारी तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देत प्रवाशांसाठी अखंड, सुविधायुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 

पीसीएमसी मेट्रो स्थानकावरून खालील मार्गांवर सेवा सुरू करण्यात आली आहे. 

1. पिंपळे सौदागर

2. काळेवाडी फाटा

3. चाफेकर चौक

4. चिखली (टाळगाव कमान)

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories