महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे विभागातर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे विभागातर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा
पिंपरी, ता. २ - सहकारनगर येथील कामगार कल्याण भवनाच्या प्रांगणात १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गुणवंत कामगार महमंद शरीफ मुलाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
यावेळी, सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त मनोज पाटील, गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके गुणवंत कामगार, सदस्य कबड्डी असो.पुणे प्रा.सागर खळदकर, उध्दव रामसने, प्रमोद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाणी यांनी अध्यक्षीय भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख,प्र.के.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या साहित्यातून, पोवाड्यातुन, जनजागृती केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांनी मुत्सद्दी राजकारणातुन संयुक्त महाराष्ट्रासाठी अनमोल योगदान दिले,अधोरेखित केले
बाळासाहेब साळुंके यांनी 'बदलते कामगार कायदे' हा विषय मांडला. त्यांनी, बदलत्या कामगार कायद्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे प्रा.सागर खळदकर यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाव्दारे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे महिला संघाने सहभाग घेतला व पदार्पणाच्या पहिल्याच प्रवेशात तृतीय क्रमांक पटकावला याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त मनोज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी खेळाडूंचा, सन्मान करण्यात आला. सिराज मुलाणी, नंदकुमार धुमाळ,वसीम मुलाणी, पांडुरंग सुतार,यासिन शेख, रघुनाथ फेगडे,शकील मुलाणी, झहीर मुलाणी यांना पुष्प देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय थोरात यांनी केले. सुहास माने यांनी आभार मानले. श्री.कळंबे, श्री.जोशी तसेच मंडळाचे सर्व केंद्रसेवक श्रीमती बाठे, श्रीमती पांगारे, श्री. प्रविण श्रीवास यांनी संयोजन केले. वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.