महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिकेच्या प्रांगणात ध्वजवंदन समारंभ
पिंपरी, ता. २ - महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन समारंभ उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.


या ध्वजवंदन प्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता सुनील बागवानी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त पंकज पाटील, संदीप खोत, अण्णा बोदडे, ममता शिंदे, प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, चेतना केरुरे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.