पिंपरी - माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे संकल्पचित्र
पिंपरी येथील भीमसृष्टीच्या शेजारी माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी भूमीपूजन समारंभ मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. माता रमाईंचे हे आपल्या देशातील पहिले स्मारक आहे. या स्मारकाचे हे संकल्पचित्र..........