महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे पुस्तक पूजन सोहळा
पिंपरी, ता. २४ - जागतिक पुस्तक दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे निगडी प्राधिकरणातील शांता शेळके सभागृहात पुस्तकपूजन सोहळा पार पडला. परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीत स्वलिखित आणि आवडलेल्या पुस्तकांचे पूजन करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. 'पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते,' असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी म्हटले.
यावेळी, कवयित्री हेमांगी बोंडे लिखित 'मधुगंधित हेमाक्षरे - कवितांची मांदियाळी' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते झाले. 'सरवा'कार प्रा. किसन वराडे तसेच प्रा. संजय पवार प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ यावेळी उपस्थित होत्या. यावेळी अभय कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांच्या हस्ते शहरातील ज्येष्ठ पुस्तक विक्रेते राजू कासट व सुनील टेपाळे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
विनिता श्रीखंडे, नीलिमा फाटक, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, इला पवार, गीता सुतार, अनघा पाठक यांनी संयोजनात सहकार्य केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बोंडे यांनी आभार मानले.
- डॉ. श्रीपाल सबनीस
- Hemangi Bonde, poetry collection, 'Madhugandhit Hemakshre', Rajan Lakhe,
- self-written books, favorite books, Dr. Shripal Sabnis, symbol of knowledge,
- World Book Day, Maharashtra Sahitya Parishad,
- निगडी प्राधिकरण, शांता शेळके सभागृह,
- पुस्तक पूजन, जागतिक पुस्तक दिन, महाराष्ट्र साहित्य परिषद