मावळात शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी मिळावा, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाची मागणी
Apr 23 2026
46
मावळात शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी मिळावा, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाची मागणी
पिंपरी, ता. २३ - मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचे शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाने राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २२) मंत्रालयात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. शेतकऱ्यांसाठी हक्काचे शेतकरी भवन उभारण्यासाठी निधी मिळावा आणि त्यामाध्यमातून सहकारक्षेत्र भक्कम व्हावे, याविषयी चर्चा झाली.
यावेळी, संघाचे सभारती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता अमोल केदारी, संचालक माणिकराव गाडी, संघाचे सचिव किरण लोहर, गणेश विनोदे, शहाजी कडू, प्रमोद दळवी, शरद नखाते, बाजीराव वाजे, आशा खांडभोर, अमोल केदारी, मारुती खांडभोर, विष्णू घरदाळे उपस्थित होते.