'पीएमपी' बसमध्ये महिलांच्या दागिन्यांची चोरी
पुणे, ता. २३ - 'पीएमपी'च्या बसमध्ये प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी आणि हडपसर गाडीतळ परिसरात या घटना घडल्या आहे. या प्रकरणी चोरट्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हिराबाई मधुकर डाळिंबे (वय ६७, रा. साईधाम सोसायटी, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हिराबाई या पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी, चोरट्याने त्यांच्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना हडपसर गाडीतळ परिसरातील आहे. पुष्पा एकनाथ ननावरे (वय ६८, रा. हडपसर) १५ एप्रिल रोजी सकाळी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी, चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. या प्रकरणी हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.