मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात
पिंपरी, ता. ३० - मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक अत्यंत उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. मावळ तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि दिशा देण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत विविध धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेत, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणे आणि विकासाला गती देणे, या उद्देशाने उपस्थित सर्वांमध्ये एकजूट आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, महादू कालेकर, सुरेश धोत्रे, दीपक हुलावळे, जिल्हा परिषदेच्या सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समितीचे उपसभापती साहेबराव कारके, दिलीप ढोरे, खरेदी-विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे, नगराध्यक्ष अबोली ढोरे आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी या बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानले. ते म्हणाले, ''आपल्या सर्वांचा विश्वास आणि सहकार्य हेच पक्षाच्या बळकटीकरणाचे खरे बळ असून, यापुढेही आपण मावळच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक सक्षमपणे काम करुया.''
Maval Taluka NCP Review Meeting
- उर्जा, Energy धोरणात्मक, Strategic आमदार, MLA विकास, Development
- उत्साही वातावरण, Enthusiastic Environment संघटना, Organization जनसंपर्क, Public Relations
- पदाधिकारी, Office Bearers कार्यकर्ता, Workers आढावा बैठक, Review Meeting
- मावळ तालुका, Maval Taluka राष्ट्रवादी काँग्रेस, NCP (Nationalist Congress Party)