निगडीतील डॉ. आंबेडकर वसाहत, आझादनगर परिसरातील नागरी समस्यांवर कार्यवाही करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
निगडीतील डॉ. आंबेडकर वसाहत, आझादनगर परिसरातील नागरी समस्यांवर कार्यवाही करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - निगडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आझादनगर परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन महापौर रवी लांडगे नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी, अ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अर्चना करांडे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे आणि मनसे नेते सचिन चिखले उपस्थित होते. सर्वांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, घरांमध्ये पाणी शिरणे, त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणे याबाबत नागरिकांनी सविस्तर माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ चर्चा करून पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था, स्वच्छता, मूलभूत नागरी सुविधांची उपलब्धता, तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना महापौर लांडगे यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त आण्णा बोदडे, हरविंदरसिंग बन्सल तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अ प्रभाग समिती, A Ward Committee, अर्चना करांडे, Archana Karande, अक्षय करांडे, Akshay Karande, सचिन चिखले, Sachin Chikhale
- मूलभूत सुविधा, Basic Amenities, प्रशासनाला सूचना, Instructions to Administration
- नागरी समस्या, Civic Issues
- आझादनगर, Azadnagar, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, महापौर रवी लांडगे, Mayor Ravi Landge
- निगडी, Nigdi, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, Dr Babasaheb Ambedkar Colony