राजस्थानचे कॅबिनेट मंत्री मदन दिलावर यांनी घेतले शांतीनगर भोसरी येथे श्री सालासर हनुमान मंदिर दर्शन
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री मदन दिलावर यांनी घेतले शांतीनगर भोसरी येथे श्री सालासर हनुमान मंदिर दर्शन
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - शांतिनगर-भोसरी येथील परिसरातील श्री सालासर हनुमान मंदिरात राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षण, पंचायती राज वसंस्कृत शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी नुकतीच भेट दिली. आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे स्वागत केले.
भोसरी येथे त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून माननीय मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. यावेळी दिलावर यांनी श्री सालासर हनुमानजींच्या चरणी दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना केली आणि सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. श्री हनुमानजींच्या कृपेने समाजात एकता, सद्भावना आणि सेवाभाव अधिक वृद्धिंगत व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना केली.
स्वागत व सन्मान सोहळ्यात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांशी मदन दिलावरजींनी संवाद साधला. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक व आध्यात्मिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अशा भेटी निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत, अशी भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.
- स्वागत समारंभ, Felicitation Ceremony
- शांतिनगर भोसरी, Shantinagar Bhosari, भोसरी, Bhosari
- शालेय शिक्षण मंत्री, पंचायती राज मंत्री, संस्कृत शिक्षण मंत्री, श्री सालासर हनुमान मंदिर, Salasar Hanuman Temple
- राजस्थान, राजस्थान सरकार, कॅबिनेट मंत्री, मदन दिलावर, Madan Dilawar
- आमदार महेश लांडगे, Mahesh Landge