पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना स्वतःचे घर घेण्याची संधी, 'म्हाडा'कडून २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी ४ मे पासून अर्जप्रक्रिया सुरु
Apr 25 2026
19
पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना स्वतःचे घर घेण्याची संधी, 'म्हाडा'कडून २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी ४ मे पासून अर्जप्रक्रिया सुरु
पिंपरी, ता. २५ - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मोक्याच्या ठिकाणी रिक्त असलेल्या २९५ सदनिकांची विक्री सुरु होणार आहे. ही घरे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर दिली जातील. या घरांच्या खरेदीसाठीची अर्जप्रक्रिया ४ मे पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार आहे, अशी माहिती म्हाडाने दिली आहे.
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या २९५ घरांमध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील म्हाडा योजनेअंतर्गत ११३ सदनिका आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील १८२ सदनिकांचा समावेश आहे. या घरांची अर्ज भरण्याची व नोंदणीची प्रक्रिया ४ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता ऑनलाइन सुरु होईल. इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरायचे आहेत. जे अर्जदार सर्वात आधी आपली सदनिका निवडतील आणि प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांनाच घरे मिळणार आहेत.
या घरांच्या खरेदीसाठी काही नियम आहेत. ते म्हणजे, ऑनलाइन पद्धतीने सदनिका निवडल्यानंतर ती तत्काळ बुक करावी लागणार आहे. त्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम अनामत म्हणून भरणे अनिवार्य आहे. ही रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतरच अर्जदाराला 'तात्पुरते देकार पत्र' (Provisional Acceptance Letter) ऑनलाइन मिळेल. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ४ मे रोजी वेळेत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे, असे म्हाडाने सांगितले.
- Mhada Housing Scheme, registration process, technical issues, home selection.
- https://bookmyhome.mhada.gov.in
- प्राधान्य, प्रथम येणाऱ्यास, तात्पुरते देकार पत्र, अनामत रक्कम, घर किमतीची १०%, प्रोव्हिजनल अक्सेप्टन्स लेटर,
- अर्जप्रक्रिया, ऑनलाइन अर्ज, ४ मे २०२६, घर खरेदी,
- पुणे, पिंपरी-चिंचवड, म्हाडा, २९५ सदनिका, विक्री, अ